Prakashdada Pimpalepatil

I am a simple persom with some extraordinary capabilities(people say yhis..)& some times I have also noticed that.

Monday, August 21, 2006

aawadleli kavita....

भरात आहे..
ज्वानी भरात आहे, मदमस्त रात आहे, मुखचन्द्र मेनकेचा, माझ्या करात आहे!
जो ना दिसे कधीही, का पूजिता तयाल -नारायणास शोधा, नक्की नरात आहे!
ह्या चंद्र-रोहिणीला, भेटावयास आता, पाण्यातल्या दिव्यांची, आली वरात आहे
मी खोदतो कधीचा, आटून जाय तॄष्णा, केंव्हा मिळेल पाणी; कुठल्या थरात आहे?
फिरवून बोट माझे, ह्या ब्रेलच्या लिपीवर, मी शोधितो स्वत:ला, ह्या अक्षरात आहे!
घ्या आज शायरांनो, भरुनी हरेक प्याला दरिया रितेपणाचा, ह्या अंतरात आहे!
-

0 Comments:

Post a Comment

<< Home